Tuesday, December 2, 2008

कोण आहोंत आम्ही ?कोण आहोंत आम्ही
काय आहोंत आम्ही
प्रतिक्रियावादी आहोंत काय आम्ही

नेहेमी कुणी तरी थप्पड मारल्यावर
हात उचलायचा विचार करतो आम्ही

दुसरा जेंव्हां आक्रामक होतो
तेंव्हाच फक्त बचाव करतो आम्ही

घाबरून लहानाला, घाबरून मोठ्याला
नेहेमीच सगळ्यांना घाबरून असतो आम्ही

आमच्या सैनिकांना नसतात शस्त्रास्त्रे
गोळ्या खायला त्यांना तयार करतो आम्ही

सरकारी नेत्यांना कमांडो लागतात
जनतेला मात्र सतत ठार करतो आम्ही

हिमालया वर सैनिकांना नसतात बूट अन् जैकेटस्
इथे मात्र अनुकूल गरम-गार असतो आम्ही

पोकळ गप्पा पोकळ डौल
दाखविण्यात मात्र हुशार असतो आम्ही