Saturday, April 4, 2009

एकसष्टी

डोंगर माथ्या वरून उतरणीला लागून ही एक दशक उलटलं
त्यांत कितितरी कांही बाही हरवलं
पण बरंच काही मिळवलं
हरवलीय आठवण
हरवलेत कान
हरवलेत डोळे
हरवलीय शक्ती, पण
मिळवला हा निवांतपणा
वेळेचं स्वातंत्र्य
हवं ते करायची मोकळीक
जबाबदारीतून मुक्ती नव्हे
ती पार पाडल्याची तृप्ती
जबाबदारी कमी झाली
सोन-पावलांनी सुना आल्या
नातवंडांचं गोड हसू आलं
सूख ओसंडून वाहू लागलं
आजी आजोबा म्हणू लागलं
क्वचित् चष्म्याच्या आंतून ओघळलं
आता कुणी हो म्हंटलं तरी
आपण तरुण व्हायला तयार नाही
कारण प्रत्येक वयाचं एक सूख असतं
ते आपण सोडणार नाही
असेना कां हा उत्तरार्ध,
पण त्याला परिपूर्णतेचीच समाप्ती आहे .

ही कविता मी गेल्या वर्षी भेट म्हणून माझ्या मावस भावाला दिली होती. माझी एकसष्टी होऊन तर तीन वर्ष होऊन गेलीत.
गैरसमजाला कारण दिल्या बद्दल क्षमस्व. कविता सर्वांना खूप आवडली होती तर विचार केला कि करावी पोस्ट. अनुभव अर्थातच् माझेच.