Friday, February 29, 2008

पाहुणा

ये ना कधी तरी पुन्हा
हो ना माझा पाहुणा ।

परत एकदा होइन मी
आतुर सखी, बावरी
राहिन खिडकीशी उभी
आकुल व्याकुळ दर्शना
ये ना कधी तरी पुन्हा

पी माझ्याच कपातुनि चहा
ऐकव तव कविता नव्या
नायका, रसिका, मोहना
लाव ना पाल्हाळ पुन्हा
ये ना कधी तरी पुन्हा

म्हण परत परत मला
दमला का माझ्या फुला
मी तुला अन् तूच मला
राहि जपुनि माझ्या मना
ये ना कधी तरी पुन्हा

पुन्हा अनुभवू जोडीनं
ते गेलेले रात दिन
ते गीत जुळवू पुन्हा
तो राग आळवू जुना
ये ना कधी तरी पुन्हा

पाहुणा

ये ना कधी तरी पुन्हा
हो ना माझा पाहुणा ।

परत एकदा होइन मी
आतुर सखी, बावरी
राहिन खिडकीशी उभी
आकुल व्याकुळ दर्शना
ये ना कधी तरी पुन्हा

पी माझ्याच कपातुनि चहा
ऐकव तव कविता नव्या
नायका, रसिका, मोहना
लाव ना पाल्हाळ पुन्हा
ये ना कधी तरी पुन्हा

म्हण परत परत मला
दमला का माझ्या फुला
मी तुला अन् तूच मला
राहि जपुनि माझ्या मना
ये ना कधी तरी पुन्हा

पुन्हा अनुभवू जोडीनं
ते गेलेले रात दिन
ते गीत जुळवू पुन्हा
तो राग आळवू जुना
ये ना कधी तरी पुन्हा

Friday, February 15, 2008

जीवन

असंच असतं जीवन
ते उगवतं फुलतं फळतं
मातीत मिसळतं परत परत
परत नव्यानं उगवायला

नव्यानं उगवतं अधिक शक्ती घेऊन
नवीन गुणचिन्ह रुजवायला
होत जातं अधिक अधिक छान
अधिक अधिक शक्तिवान
त्याच्या वाटेत अडसर असणा-यांचं
ते राखत नाही मान
त्यांना बाजूला सारून पुढे जायचं ठेवतं भान

असंच असतं जीवन
मार्ग काढून पुढे जायचं
जो पुढे गेला तोच जिंकला
असंच सा-यांनी म्हणायचं

Monday, February 4, 2008

साद

हलकेच घातलेली ती साद आली कानी
अन् दूर वर कुठेशी ती शीळ घुमली रानी
रानात पाखरांनी केलाच किलबिलाट
अन् आम्र-मंजरींनी केली सुगंधी वाट
बघ वाहू लागला तो स्वच्छंद मंद वारा
पाण्यास स्पर्शुनी तो कां थरथरे किनारा

त्या हरिण शावकांनी केल्यात उंच माना
कोकीळ ही सुरेल त्या घेऊ लागे ताना
अन् कोवळे किरण हे बघ उजळती धरेला
त्या केशरी छटा ही रंगतात अंबराला
ही प्रीत तुझी माझी का भावली निसर्गा
जणु हात धरित्रीचे बघ टेकलेत स्वर्गा
हे भाव विश्व अपुले ह्रदयात जपुनि ठेवी
मग स्वप्निच्या फुलांना सुगंध मंद येई