Saturday, August 6, 2011

आठवणींच्या चिमण्या



आठवणींच्या चिमण्या
भिरभिरतात मनाच्या अंगणांत
टिपतात दाणे मागल्या क्षणांचे,
दिवसांचे, महिन्यांचे अन वर्षांचे सुध्दा .
केंव्हा घेतला होता आईनं पापा
गालांवरचे अश्रू पुसून
किंवा दिला होता निळा पेन बाबांनी
मला आवडतो म्हणून
केंव्हा ऐकता ऐकता वाटलं होतं
अपरूप दादाच्या कवितांचं
केंव्हा वाटली होती असूया
अक्काची न बोलता सारं कळण्याची
केंव्हा केली होती अण्णाशी भांडा भांडी
केंव्हा घातला होता मिंदू ला धपाटा
केंव्हा गैलरीतून बघितलं होतं त्या देखण्याला
केंव्हा पुढे केला होता बोरं भरला हात
केंव्हा झालं होतं कौतुक, अन्
केंव्हा झाला होता राग राग.
केंव्हा पडल्या होत्या अक्षता अन् कळसाचं पाणी
केंव्हां फुलली होती बाग
केंव्हा लावलं होतं प्रेमाचं रोप
केव्हा बहरलं ते फुला फळांनी
चिमण्या बाळाच्या चिमण्या मुठी
पावलांच्या मऊ मऊ करंज्या
काजळ, तीट, जॉन्सन बेबी पावडर,
अमूल स्प्रे
वाढती पाउलं, लहान होणारे बूट,कपडे
त्यांचं मोठं अन वेगळं होणं
किती किती दाणे संपतच नाहीत
मीच येते अचानक भानावर, अन् येते अंगणातून घरांत .

5 comments:

विनायक पंडित said...

आशाताई! खूपच आवडली! खूपच! मीही तुमच्याबरोबर ते सगळं बघतोय असं वाटत होतं!:)

sachin patil said...

व्वा व्वा आशाजी एकदम बढिया है.....
आठवणी हृदयातल्या
उमलल्या शब्द फ़ुलांनी
डोळ्यात तरळले ते
जुने दिवस ...
आठवणी
भुतकाळाला स्पर्श
करुनी..
क्षणात भुर्कन जातात
ऊडुनी...

Harshada Vinaya said...

Khupach touchy.. Tyanche mothe ani 'vegale' hone.. hmm

प्रसाद साळुंखे said...

सुंदर ताई, दाना दाना खनके :)

प्रसाद साळुंखे said...

सुंदर ताई, दाना दाना खनके :)