Tuesday, December 18, 2007

आयुष्य

आयुष्य म्हणजे असतं तरी काय
आयुष्य असतो इतिहास
तारखा वार सण
दिवस मास सण
युध्द झुंजी मरण
य़श, अपयश, स्मरण
उत्कर्ष, -हास, हास, परिहास
आयुष्य असतो इतिहास

आयुष्य असतं गणित
बेरजां पेक्षा वजाबाक्या जास्त
गुणाकारा पेक्षा भागाकार म्हणणे रास्त
आयुष्याची समीकरणं सोडवता सोडवता
संपून जातात, आयुष्याची पानं
अवघड, कठिण, जटिल
आयुष्य असतं गणित

आयुष्य असतं साहित्य
अश्रुंची फुलेच जिथे उमलतात
शोकांतिका जास्त फुलतात
कधी कधी होतो विनोद सा-याच जीवनाचा
कविता फक्त स्वप्नातच डुलतात
अन् कल्पनेतच राहून जातं लालित्य
आयुष्य असतं साहित्य

आयुष्य असतं राजकारण
ज्याचं त्याचं आपलं समीकरण
डाव पेच हार जीत
कधी पट कधी चीत
सत्ते साठी जोड तोड
पैशा साठी सारे गोड
सारंच अद्भुत असाधारण
आयुष्य असतं राजकारण

आयुष्य असते तडजोड
आयुष्य असते घडामोड
आयुष्य असते हसू
आयुष्य असते आँसू
आयुष्य असतो आरसा
आयुष्य असतो कवडसा
आयुष्य असतं रेशमी जाळं
ज्यात जखडला असतो मनुष्य
असं हे आयुष्य.

12 comments:

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

आशाताई,
फारच सुरेख आहे ही कविता. आणि पाऊस सुद्धा.
-सौ. प्रतिमा उदय मनोहर

प्रशांत said...

आशाताई,
तुमच्या कवितांमधले अनुप्रास खूप बोलके वाटतात.
"डाव पेच हार जीत
कधी पट कधी चीत
सत्ते साठी जोड तोड
पैशा साठी सारे गोड"
"पाऊस"कवितेतलेही अनुप्रास मनाला भावले.
सुरेखच आहे कविता. आयुष्याचं यथार्थ वर्णन आहे.
-प्रशांत

आशा जोगळेकर said...

तुमच्या अभिप्राया बद्दल आभार.

HAREKRISHNAJI said...

आयुष्य खुप संदर आहे

Tulip said...

sunder!! sadhya, sopya bhashetalya.. kadachit mhanunch jast sunder ahet saryach kavita.

Meghana Kelkar said...

Asha Tai majhya blog la abhipray dilat mhanun ithe ale tar ALice in Wonderland sarkhi haravle...:)

Unknown said...

asha tai khup chhan lihita.jeevan he asach asat.magacha visarun pudhe jat rahayacha

संदीप सुरळे said...

Jiavanaache sagalec rang maandalet tumhi tumachyaa kavitet...agadi sahajatene...vaah!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे said...

व्वा !!! सुंदर कविता आवडली.

विनायक पंडित said...

आशाताई!
खूप छान आहेत तुमच्या कविता!
या कवितांमधे गेयता आहे तिच्या प्रेमात पडणं कुणालाही शक्य आहे!!!
आयुष्य ही कविता उत्तम!
आयुष्यातले सगळे रंग यात आले आहेत, तिला एक छान ओघ आहे.मी सरळ त्यात वहात गेलो.
अप्रतिम!
सतत लिहिता आहात ते खूप छान आहे, आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद!

धनंजयुगाच said...

खूप छान आशाताई ...........

धनंजयुगाच said...

खूप छान आशाताई ...........