Tuesday, March 18, 2008

वाजते बासरी

वाजते बासरी यमुना तीरी
रंग उधळती दश-दिशां वरी

गोपी सा-या रंग खेळती
घेउनि पिचकारी करी
बघतो कौतुक श्रीहरि । वाजते बासरी…

भिजती साड्या भिजती चोळ्या
भिजती गात्रे सारी
उठती मनीं आनंद लहरी । वाजते बासरी…

प्रीत रंग मग असा उसळता
मग्न सर्व नर नारी
नसे चित्त भानावरी । वाजते बासरी….


या अपूर्व रंगात नाहती
राधा अन् गिरिधारी
नाचते गोकुळ ताला वरी । वाजते बासरी…

5 comments:

मोरपीस said...

फ़ारच छान

प्रशांत said...

सुरेख! मस्तच जमली आहे कविता. होळीचं चित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं.

अमित said...

नेहमीप्रमाणेच, सुंदर...

अगदी योग्य वेळी योग्य कविता वाचायला मिळली, आत्ताच आमचे होळीचे plans ठरत होते :).

अशाच अनेक सुंदर कविता तुमच्या ब्लॉगवर वाचायला मिळत राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना... :)

Sneha said...

kharach sundar..pan hya kavitela chal lavali tar gan hoil sundar gan...

अजित वडनेरकर said...

सुंदर शब्दचित्र। मैं फिर कहूंगा कि आपकी मराठी कविताएं मुझे हिन्दी से भी ज्यादा पसंद हैं।
मराठी शब्दों में जो भाव व्याप्त हैं उसे आप मुक्तछंद में बहुत अच्छे ढंग से, कुशलता से अपने मनोभावों को अभिव्यक्त करने में प्रयोग कर लेती है ।
होली की रंगबिरंगी बधाइयां...