देहाच्या डबीतला प्राणांचा कापूर केंव्हा आणि कसा उडून जातो कळत सुध्दा नाही डबीचं झाकण उघडं राहातं नकळत कण कण उडत राहातो नकळत अन् फक्त डबीच उरते ती फेकूनच द्यावी लागते शेवटी
एक सामान्य भारतीय स्त्री. दिल्लीत नोकरी केली
१९९९ पर्यंत. तेव्हापासुन मुलांकडे अमेरीकेत व दिल्लीला वेळ वाटणी. कविता लिहिण्याची अन इतरांना दाखविण्याची हौस ही पारिवारिक देणगी.झुळुक ह्या
ब्लाग वरील सा-या कविता माझ्याच. त्यांच्या सजावटीचं श्रेय मात्र माझे पती सुरेश जोगळेकर ह्यांचं. आमचे कंम्प्यूटर एक्सपर्ट तेच. तुमचा अभिप्राय अवश्य कळवा.
ऋतुरंग हा माझ्या दादाच्या (डॉ. शरद काळे ह्यांच्या) कवितांचा ब्लॉग. दादाच्या कविता अगदी वेगळ्याच आहेत त्या पुस्तक रूपानंही प्रसिध्द झाल्या आहेत पण त्या ब्लॉग वाचकांना खचित आवडतील हा विश्वास आहे. दादा पेशानं डॉक्टर पण ह्रदय कविचं ते सारं तुम्हाला त्याच्या कवितांतच दिसेल. पण वाचा नक्की अन् अभिप्राय आवडेलच. दादा नाही न आता म्हणून मीच करतेय हे.
7 comments:
kharech ahe g,Asha...
एकदम अस देह, प्राण वगैरे !
या वयात असे विचार येणारच ना । अन विचारांना मज्जाव करायचा नसतो ना ?
या वयात असे विचार येणारच ना । अन विचारांना मज्जाव करायचा नसतो ना ?
अप्रतिम!
Fakt 7 olint kiti sunder vichaar maandalaat....grt!
सुंदर कविता आवडली.
Post a Comment