तेंव्हांच ठरवलं होतं आपण चांगलंच वागायचं
अन् जपायचं तिला. ती जी कुणी असेल
जी आपलं सर्वस्व ओवाळून टाकेल माझ्या वरून
तिला फुलागत फुलवायचं, राणी सारखं ठेवायचं
अन् आपणही भरपूर सुखांत डुंबायचं

पण हे सारं स्वप्नच राहिलं
तू आलीस सोन्याच्या पाउलांनी लक्ष्मी सारखी
पण ही लक्ष्मी केव्हढी कडक
केंव्हांही मूड जाणार,
केंव्हां ही थयथयाट होणार,
अन् केंव्हां ही माहेरी निघून जाणार.
अन मग तिथली मोठी माणसं माझे वाभाडे काढणार
घरांतून वेगळं हो म्हणणार.
हे असंच, असंच चालत राहाणार
स्वप्नांच्या ठिक-या ठिक-या झाल्या आहेत
त्याच गोळा करण्यात माझा जन्म जाणार