Monday, August 4, 2008

चूक बाईचीच

मी स्तब्ध उभी होते
तुझ्या उत्तराची वाट बघत
ते आलंच नाही, कारण ते येणार नव्हतंच
मीच खुळी, मला वाटत होतं
कि ते होकारार्थीच असेल
पण तू तिथे उगाच उभा राहिलास
वाचा गेल्या सारखा.
अन् माझे धिंडवडे काढले सा-यांनी
हवं ते, हवं तसं बोलून
माझे डबडबलेले डोळे तुला दिसलेच नाहीत
माझा प्रश्न, आपलं एकमेकां वर प्रेम आहे न्
आपण लग्न करणार आहोंत खरं ना,
अनुत्तरितच राहिला.
मी स्तब्धच उभी राहिले
अपराधी पणाचं ओझं घेऊन.
लहान पणा पासून सवयच आहे ती मला
चूक कुणाची ही असो
शिक्षा ही बाईलाच व्हायची.

No comments: