Wednesday, September 24, 2008

दूर मी जातोदूर मी जातो अता मज साद तू घालू नको
बंध हे तुटले अता त्यां गाठ तू घालू नको ।

उत्तरें देतां समाजा, लाज तुज येईल गे
जे मी केलें, ते कसें, कां, प्रश्न मज घालू नको ।

घडलेच जे अपुल्या मधे ते राहू दे गुपितांत गे
लक्तरांना प्रीतीच्या, वेशीस तू टांगू नको ।

वाट्यास जे आले म्हणावे प्राक्तनच गे आपुले
त्याच साठी ह्याला त्याला बोल तू लावू नको ।

असले जर दैवात होइल भेट ही केंव्हा तरी
वाट बघतां ओसरीला तू दिवा लावू नको ।

3 comments:

प्रशांत said...

सुरेख़..... नेहमीप्रमाणेच!

चैताली आहेर. said...

असले जर दैवात होइल भेट ही केंव्हा तरी
वाट बघतां ओसरीला तू दिवा लावू नको ।khup chhan.... ek-ek sher lajawab....!!

Yogesh Jayant Khandke said...

मालावुन टाक दीपं ... च्या चालिला चपखल बसतय.