Tuesday, February 3, 2009

प्रीत

सागर हा निळा आकाश ही निळं
तुझ्या डोळियांचं तळ
मीच मीन ।
शामल ढगांची आकाशात गर्दी
मीच एक दर्दी
कुंतलांचा ।
दोन क्षण भेट जिना उतरता
तुझ्याशी बोलता
लागे धाप ।
कशी ही प्रीती कुणावरी जडे
प्रेमाचे हे तिढे
न सुटती ।
मनांत न मावे आनंदी आनंद
एकच हा छंद
तव भेटीचा ।
माझ्याच सारखी तू ही कासावीस
मला तू हवीस
अन् तुला मी ।

3 comments:

प्रशांत said...
This comment has been removed by the author.
प्रशांत said...

नमस्कार आशाताई,
"तू तिथं मी" या चित्रपटाची आठवण झाली.
ब-याच दिवसांनी तुमची कविता वाचून आनंद झाला.

-प्रशांत

चैताली आहेर. said...

ओह.....

गोड कविता.....

मी तूम्हाला contact कसा करू???
e-mail ID मिळेल का?? orkut profile???
माझा dingiaher@gmail.com