Thursday, July 16, 2009

मनातल्या मनांत

मनातल्या मनांत मी
मनातल्या मनांत तू
प्रीत कळ्या फुलविल्या
प्रेम ज्योति लाविल्या
न च तू आली कधी
न मज बोलाविलेस तू । मनातल्या मनांत
कधी हसुन पाहिले
कधी नजर चोरली
कधी हळूच लाजली
कधी गंभीर जाहली
पण मनातले खुळे
भाव जपलेस तू । मनातल्या मनांत
कधी तुझ्या वाटेत मी
कधी लाटेत राहिलो
पुस्तकें देण्या मिशें
स्पर्श इच्छित राहिलो
साहस नच केले कधी
न येवो मनांत किंतु । मनांतल्या मनांत
कधी तरी होईल सत्य
स्वप्न हें मनातले
जे जपुन ठेविले
आंत ह्रदयातले
कधी तरी येऊन जवळ
माझीच रहाशील तू । मनातल्या मनांत

2 comments:

mehek said...

स्वप्न हें मनातले
जे जपुन ठेविले
आंत ह्रदयातले
कधी तरी येऊन जवळ
माझीच रहाशील तू । मनातल्या मनांत
Posted by आशा जोगळेकर
khup sunder bhav,ekdam avakhal,jase manatle bolale kunitari.

bhaskarkende said...

आज पहिल्यांदाच तुमच्या अनुदिनीला भेट दिली. खूप चांगल्या कविता करता आपण. आपल्या कविता अशाच खुलत राहोत.