Sunday, September 20, 2009

शक्ति याचना

भद्र काली, महादुर्गा, हिमनंदिनि नमो नमः
दैत्य असुर संहारिणि, भक्त रक्षिणि नमो नमः
शक्तिरूपा, दैन्य हर्ती, शत्रु ताडिनि, नमो नमः
भक्तांस्तव आशिर्वच, दे शक्ति नमो नमः ।

आसुरि रंगात रंगले,राज्यकर्ते नमो नमः
सैन्यशक्ति, खड्ग,भाले गंजलेले नमो नमः
मोहाने डोळे ह्यांचे तारवटले नमो नमः
औढुनि आसूड करी जागृत ह्यां नमो नमः ।

शत्रु दारांत ठेपले, आंतहि लपले नमो नमः
जन सारे नाच-गाण्यांत रंगले नमो नमः
कशास्तव माझेच हे अंतर जळे नमो नमः
जागवून चेतना यां करि जागृत नमो नमः ।

पुन्हा एकदा वाहू दे वारे देश भक्तीचे
पुन्हा एकदा स्फुरु दे बाहु युवा शक्तीचे
नेत्यांना मिळू दे कसब नीति युक्ती चे
पुन्हा एकदा उजळो भाग्य या भारती चे ।

भद्र काली, महादुर्गा, हिमनंदिनि नमो नमः
दैत्य असुर संहारिणि, भक्त रक्षिणि नमो नमः

1 comment:

प्रशांत said...

>पुन्हा एकदा वाहू दे वारे देश भक्तीचे
>पुन्हा एकदा स्फुरु दे बाहु युवा शक्तीचे
>नेत्यांना मिळू दे कसब नीति युक्ती चे
>पुन्हा एकदा उजळो भाग्य या भारती चे ।


आजच्या काळात याच फलश्रुतीची गरज आहे.



ईशस्तवनाच्या स्वरूपाची ही कविता आवडली.