ढगांची दुलई पांघरून
सूर्य अजून लोळतोय
कर्मयोगा ची वाट लावतोय ।
धुक्या ची कुल्फी मलई
काठो काठ भरून
आकाशच करतंय एन्जॉय
किरण चमचा धरून ।
कुठे शेकोटी कुठे हीटर
कुठे सेंट्रल हीटिंग धाववतंय मीटर
पण रस्त्यावरच ज्यांच बेडरूम
त्यांच्या साठी सरकारच झालंय चीटर ।
गारठलेल्या हातांनी
तू कुरवाळायचीस
तेंव्हा तुझा किती राग यायचा
थंड लागतंय ग असं म्हणायचा
आज सारखं वाटतंय तो स्पर्श व्हावा
पण आई तू ह्या थंडी गरमी च्या पलीकडे
कां बरं निघून गेलीस ।
Saturday, January 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
आईच्या बोटातली जादू काय असते कोणास ठाउक? प्रेम, काळजी, निरपेक्ष भाव आणि शुभेच्छा तीच्या बोटातून केसात हळूवार फ़िरायच्या. आम्ही चार भावंडं! पण आइचा हात कधी चुकला नाही, आणि तो फ़िरल्यावर कधी थंडी जाणवलीच नाही, ती गेल्यावरही तीच्या गोधडीची ऊब अजून तोच भाव देते.तुमच्या शब्दातही तीच जादू आहे, परिस्थितीत भाव बघायचा आणि शब्दात परिस्थिती उतरावयाची!
गेले वर्षभर का कोणास ठाउक, वेळच मिळाला नाही म्हणून लेखनच झाले नाही, पण आता नियमीत पणे भेटू या. तुमची सूचना मान्य!
khup chhan kavita ahe.........
Post a Comment