Tuesday, April 6, 2010

किती तरी

किति तरी चालून आलोय
पण किती अजून चालायचंय ?
कुणा साठी काय काय
किती तरी करायचंय ।
आयुष्य तर जगून झालंय
पण मनातलं सांगायचंय
आयुष्यावर किती तरी
कुणाशी तरी बोलायचंय ।
संपत आलीय वाट वाटतंय
तरी ही अजून चालायचंय
सोबतीचे सारे सोडून
एकटयानेच पुढे व्हायचंय ।
तरीही प्रत्येक दिवशी
उत्साहानं उठायचंय
आजचा दिवस शेवटचा
असंच समजून जगायचंय ।

2 comments:

प्रशांत said...

मस्त कविता.

अशा कितीतरी कवितांना
या ब्लॉगवर व्यक्त व्हायचंय
आणि नदीसारखं अखंड वाहून
शब्दफुलांना फुलवायचंय

Suman said...

asha ji khup divasani marathi kavita vachayela chhan vatle me tumache sagle kavita vachle mala khupach chaan vatlet ho kharech............