Thursday, August 19, 2010

प्राप्य

माझे मला मिळाले जे काहीं प्राप्य होते
मग आज ही कशाला ईर्षा फुकाच होते ।
जो तोच गुंतलेला व्यापात आज अपुल्या
त्यांना उगाच माझे ओझे कशास होते ।
हे भोग शरीरि माझ्या, सरतील ही उद्याला
जखमा मनांत ओल्या कुणि कां उगाच देते ।
माझेच कर्म सारे माझ्या समोर आले
मग आज मी अकारण अशी कां उदास होते ।
देशात गांजलेली जनता उपाशी असता
चापून मेजवानी, निजती खुशाल नेते ।
आतंक आज व्यापी देशास सर्व दूर
तरी किती, कुठे, कुणाला, रे काळजी रहाते ।
नुसता विचार करुनी घडणार नाही कांही
चल ऊठ अता मित्रा, ये घडवू देशातें ।

7 comments:

अरुणेश मिश्र said...

प्रशंसनीय ।

डा. अरुणा कपूर. said...

माझेच कर्म सारे माझ्या समोर आले
मग आज मी अकारण अशी कां उदास होते ।

..हे मन बोलतेय!...खूपच छान!

प्रशांत said...
This comment has been removed by the author.
नरेंद्र गोळे said...

खरय! तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई!! असाच संदेश आपण स्वतःस घ्यायला हवा आहे. कविता आवडली.

http://nvgole.blogspot.com/2010/08/blog-post_31.html

प्रशांत said...

गोळेकाकांनी "पाऊस-कविता" या उपक्रमात खो दिलाय तुम्हाला. कृपया त्यांच्या प्रतिक्रियेतला दुवा पहा.

Suman said...

deshat ganjleli janata upashi asta!
chapun mejvani,nijati khushaal nete!!
agdi sunder gajal ahe........

Suman said...

asha tai mi marathi ani majhi matrubhasha marathi ahe.....