मन सुसाट पळते
मला नको तिथे नेते
नको नको मी म्हणता
नको तेच दाखवते ।
मन माजवते मनीं
किती काहूर काहूर
नाही नही ते विचार
करून हुर हूर ।
मन किती हे चपळ
जसे हरिण हरिण
क्षणि इथे क्षणि तिथे
ह्याचे कठिण कठिण ।
मन नाठाळ नदी से
वाहावते दूर दूर
बांध तोडून आणते
सर्वत्र महापूर ।
मन वा-या संगे नाचे
मन भिजे पावसांत
मन कधि हो ढगाळ
कधी तापते उन्हांत ।
ह्या मनाचे नाही खरे
ह्याचा लागेच ना ठाव
कधी वाटे जवळचे
कधी राखे दुजा भाव ।
Monday, October 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

4 comments:
मस्त.
खर आहे अगदी.
मनाचा काही भरोसाच नाही.
"मन कंपन हे मन कंपन
अणू गर्भात की विश्वबीजाताले "
शशांक
माझ मन पण असच आहे...
"मन सुसाट पळते
मला नको तिथे नेते
नको नको मी म्हणता
नको तेच दाखवते । "
मस्तच...!!!
man he asech aahe ho.....
Post a Comment