Sunday, November 6, 2011

प्रेमाला रंग असावाप्रेमाला रंग असावा,
प्रेमाला गंध असावा,
प्रेम मन मोरच व्हावा,
थुई थुई नाचत जावा ।

अंगणी जुई फुलावी,
पारिजात वृष्टी व्हावी,
वा-याच्या झुळुके सरसा
टप,टप,टप पाउस यावा ।

गुलाबी अन सोनेरी,
चांदण्या सम चंदेरी,
हरळीच्या हिरवाईसा
चहूकडे पसरत जावा ।

सोनेरी सकाळ व्हावी,
रुपेरी रात्र असावी,
केशरी सायंकाळी
अचानक प्रियकर यावा ।

पक्षांची किलबिल गाणी,
भ्रमरांची मधु गुणगुणणी
प्रेमाचा मृदु कलरव तो
ह्रदयी अनुनादत रहावा ।

5 comments:

डा. अरुणा कपूर. said...

खरच!...फारच सुन्दर कल्पना आहे!...वाचून खूपच आनंद वाटला!

विनायक पंडित said...

खूपच छान आशाजी! चित्रही मस्त टाकलंय! शुभेच्छा!

ऊर्जस्वल said...

कल्पनारम्य आणि साजिर्‍या शब्दांत सजवलेली कविता आवडली!

प्रशांत said...

>>सोनेरी सकाळ व्हावी,
रुपेरी रात्र असावी,
केशरी सायंकाळी
अचानक प्रियकर यावा <<

क्या बात है! मस्तच.

kumar mandhare said...

अप्रतिम . . . . .