Tuesday, April 17, 2012

क्षितिजाच्या पलीकडे

तुझी दुःखाची तलम चादर
त्यांत विणलेली शब्दांची कोमल फुलें
हात लावायला धजावत नाही मन
पण एक अपूर्व आकर्षण मात्र वाटतं
संध्याकाळची गूढ वेळ अन् तिचं तुझं नातं
नितांत वैयक्तिक पण तरीही
केंव्हा तरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारं
ती तलम चादर पांघरूनच वावरलास सदैव
अचानक् एका दुपारी मात्र फेकून दिलीस ती चादर
अन निघून गेलास क्षितिजाच्या पलीकडे ।

3 comments:

प्रशांत said...

"अचानक् एका दुपारी मात्र फेकून दिलीस ती चादर
अन निघून गेलास क्षितिजाच्या पलीकडे ।"
अगदी "ग्रेस"फ़ुल.

Aruna Kapoor said...

अंत दु:खद!...मात्र मागे राहिल्या आठवणी!....खूपच छान कृति!

Harshada Vinaya said...

Avadali kavita..