Saturday, May 23, 2015

नातीं



नात्यांना जपावं हळुवार
ती असतात
बकुळ फुलां सारखी
कोमेजली तरी
सुवासच देतात।

नात्यां करता
घ्यावी थोडी तोशीस
झिजावं चंदना सारखं
मग ती कसा सुगंध
पसरतात।

नाती जपावी पुस्तकातल्या
गुलाबा सारखी
मग कधी तरी
तीं आठवणींचा
ओलावा देऊन जातात।

नाती ठेवावीत ताजी
मनांतल्या ओलाव्यात
मग ती कशी अलगद
उमलतात।

ही मनाची नाती जोपासावीत
कधी मधी मग
भेट जेंव्हा व्हावी
कसा अचानक आनंद
देऊन जातात।








4 comments:

प्रशांत said...

नाती असतात
वाफाळत्या चहासारखी
क्षणात तरतरी आणणारी

Asha Joglekar said...

वा, वाफाळलेल्या चहाची उपमा मस्त प्रशांत.खूप दिवसांनी तुला ब्लॉग वर पाहून बरं वाटलं.

Unknown said...

ख़ुपच छान कविता आहे.

तुमचे कलेक्शन आणि ब्लॉग पण खुपच छानआहे.

कृपया माझ्या ब्लॉग वर व्हिजिट करावी.


http://jivanmantra4u.blogspot.in

धन्यवाद.

Asha Joglekar said...

माझ्या ब्लाॅग वर आलात , अभिप्राय दिलात , खूप आभार.