Saturday, December 1, 2007

हात

माझे हात आता सुंदर दिसत नाहीत
कुरूपच दिसतात म्हणाना
उभारलेल्या नसा, सुरकुतलेती कातडी
झिजलेली कडक नखं
पण मला ते सुंदरच वाटतात कारण
माझं ह्या हातांवर खूप प्रेम आहे
जन्मभर ते माझ्याकरता झिजले
फाय़ली उपसल्या, लिहिलं, केर काढले,

भांडी घासली, कपडे धुतले, भाज्या चिरल्या,
कणिक भिजवली, पोळ्या लाटल्या,
अन् अजूनही ते न कुरकुरता हे सारं करतात
शिवण ही शिवतात कधी कधी
ते म्हणत नाहीत कि आम्ही थकलो
मीच म्हणते मी थकले
माझ्या आज्ञेचा अवकाश
कि ते लगेच कामाला लागतात
अशा ह्या हातांवर मी कां बर प्रेम करू नये
मी मी म्हणून जी काही आहे ती ह्यांच्याच मुळे ना

4 comments:

प्रशांत said...

सुरेख विचार.

Shuchita said...

वा!!!

खर तर तुम्ही मला माझी आई काय विचार करत असेल हे अगदी मोजक्या अणि फार सोप्या शब्दात सान्गितलय

मन:पूर्वक आभार

Sneha said...

खुप खरं आणी मनाला भावणार आहे...
मला मझ्या आइची आठवण आली...
तिचेही हात असेच थकायचे पण माझ्या सठी कधीच थांबले नाहीत... आणी ज्या दिवशी थांबले त्या दिवसापासुन परत कधिच चालले नाहित..
thanks...

Meghana Kelkar said...

Asha tai, surekh kavita!! Tumhi majha blog nehmi wachnar he wachun duppat hurup ala!