Sunday, January 20, 2008

माझं मन

माझं मन व्हावं विशाल अंगण
खेळावी त्यात माझी नाती गोती

माझं मन व्हावं चिमणं पाखरू
भरा-या माराव्या दूर दूर किती


माझं मन व्हावं शीतल चांदणं
सुखवावं त्यांना जवळ जे येती

माझं मन व्हावं सूर्याचा किरण
पोचवावी ऊब जिथे गोठलीय प्रीति

माझं मन व्हावं हिरवी हिरवळ
क्षुब्ध नयनी थंडावा आणावा अति

माझं मन व्हावं गगनाची निळाई
अपार जयाचा विस्तार किती

माझं मन व्हावं सागर अथांग
सामावून घ्याव्या सा-या रीती नीति

माझं मन व्हावं तरल तरल
आणि मला यावी त्याचीच प्रचीति

9 comments:

प्रशांत said...

surekh...

अमित said...

सुंदर. खुपच छान कविता...
आपण फ़ारच छान लिहीत आहात.
इथुन पुढेही अशाच अनेक सुंदर कविता ह्या blog वर वाचायला मिळत राहतील हीच सदिच्छा.

आपल्या काही कविता मी माझ्या आवडत्या कवितांच्या संग्रहात घेतल्या आहेत. आपली परवानगी मिळाल्यास त्या माझ्या blog वर प्रसिद्ध करण्याची इच्छा आहे [अर्थातच आपल्या नावासहित]. धन्यवाद.

तुषार खरात said...

kavita khupach chan aahet

Meghana Kelkar said...

माझं मन व्हावं सूर्याचा किरण
पोचवावी ऊब जिथे गोठलीय प्रीति
bahot khoob!!

Tulip said...

आशादिदी खूपच सुंदर आहे ही कविता. तुमच्या कविता मी नेहमीच वाचते आणि त्यातल्या साध्या, सुंदर शब्द आणि सोप्या आशयासाठी मला त्या खूप आवडतात.
मौनराग वरची तुमची कमेन्ट वाचली. तिथे खरंच काही लिहिलं गेलेलं नाहीय बरेच दिवसांत. बहुतेक वेळा ट्युलिप्स इन ट्वायलाईट ह्या माझ्या मुख्य ब्लॊगवरच लिहिलं जातं. तिथे आलात कधी तर मला नक्की आनंद होईल.

mehek said...

khup sundar

Sneha said...

mala bahinaa baichya kavitechii aathavan jhaali....:)
khupo chaan aahe

HAREKRISHNAJI said...

वाचुन मन प्रसन्न झाले

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

faracha chan lihila aahe