Friday, February 29, 2008

पाहुणा

ये ना कधी तरी पुन्हा
हो ना माझा पाहुणा ।

परत एकदा होइन मी
आतुर सखी, बावरी
राहिन खिडकीशी उभी
आकुल व्याकुळ दर्शना
ये ना कधी तरी पुन्हा

पी माझ्याच कपातुनि चहा
ऐकव तव कविता नव्या
नायका, रसिका, मोहना
लाव ना पाल्हाळ पुन्हा
ये ना कधी तरी पुन्हा

म्हण परत परत मला
दमला का माझ्या फुला
मी तुला अन् तूच मला
राहि जपुनि माझ्या मना
ये ना कधी तरी पुन्हा

पुन्हा अनुभवू जोडीनं
ते गेलेले रात दिन
ते गीत जुळवू पुन्हा
तो राग आळवू जुना
ये ना कधी तरी पुन्हा

3 comments:

दीपिका जोशी 'संध्या' said...

आशाताई.. बर्‍्याच दिवसांनी तुमच्या सगळ्याच कविता वाचल्या मी...खूपच मस्त लिहीता. आमच्या सारख्यांना हे प्रोत्साहनपरस्ते वाटतं...
दीपिका जोशी 'संध्या'

Rasika Mahabal said...

mast zalya ahet sarv kavita.

आशा जोगळेकर said...

http://sandhyavj.wordpress.com/