संसार ताप विकलित, भक्तांस्तव सुखद मेघ
भुज विशाल, धनुधारी, एक वचन दगड रेघ
सुस्मित वदन, करुण ह्रदय, भक्तांचा कैवारी
सुर नर मुनि दुख हर्ता, रिपु राक्षस संहारी
राम नाम सीता-पति, विना कारण कृपाळ
आर्त ह्रदय भक्तांचा शीतल चंदन दयाळ
आदर्शच मूर्तीमंत रघुपति जो जगत्पाळ
तन, मन, धन जो अर्पी करि त्याचा तो सांभाळ
देह दिला करण्याला काम नित्य प्रति क्षणी
कारण अन् कार्य सर्व अर्पावे राम चरणी
चिंता भव-भय सारे होइल मग दूर झणि
आनंदच आनंद राहील भरुन तनी मनी
Monday, April 14, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
मस्त आहे.
Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Smartphone, I hope you enjoy. The address is http://smartphone-brasil.blogspot.com. A hug.
सुरेखच जुळली आहे कविता. बर्याच दिवसांनंतर मी ब्लॉगला भेट दिली आणि नेहमीप्रमाणे मेजवानी मिळाली.
Post a Comment