Sunday, April 27, 2008
सुख निर्वाणी
नसावी इच्छा नसावी आकांक्षा
तृप्त असावं मन
नसावा द्वेष नसावी ईर्षा
शांत असावं मन
आल्या दिवसाचं करावं उत्साहानं स्वागत
उत्साही असावं मन
आनंदानं करावं पडेल ते काम
ओतावं त्यांत तन, मन, धन
वेगळी कांही ध्यान धारणा करण्याचं
उरणारच नाही मग कांही कारण
मन आनंदी असल्यावर
बाकी सारंच असेल अकारण
ब्रह्मानंदा चा अनुभव लाभेल क्षणो क्षणी
अनिर्वचनीय सुख लाभेल निर्वाणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
"पडेल ते काम
ओतावं त्यांत तन, मन, धन
वेगळी कांही ध्यान धारणा करण्याचं
उरणारच नाही मग कांही कारण"
जीवन कसं जगावं? याचं सार या ओळींमध्ये आकर्षकपणे मांडलंय. मस्तच आहे कविता.
सुंदर। लगा जैसे बुद्ध की वाणी मराठी में पढ़ रहा हूं।
kavitaa chhanach aahe...
Tatyaa.
http://www.misalpav.com/
Post a Comment