Thursday, June 12, 2008

म्हातारपण

म्हातारपणात ही सुख असतं
सुख कशाची ही घाई नसण्याचं
सुख सर्व कांही आरामशीर करण्याचं
सुख नातवंडांना दिसामाशी मोठं होतांना बघण्याचं













सुख कशाचीच जबाबदारी नसण्याचं
सुख पूर्वी केलेल्या कष्टांची फळं चाखण्याचं
सुख नवीन पिढी कडून आदर मिळविण्याचं
सुख भेगाळलेल्या टाचांवर मलम लावत बसण्याच्या निवांत पणाचं
सुख दुपारी पुस्तक घेऊन लोळत पडण्याचं
म्हातारणातही सुख असतं, फक्त ते मजे मजेनं भोगता यायला हवं.

5 comments:

प्रशांत said...

काय योगायोग आहे!
काल "मी तू तिथं मी" चित्रपटातलं गाणं ऐकलं
"आलो कुठून कोठे तुडवीत पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनात" (कवींच नाव माहित नाही.)
आणि आज तुमची ही कविता वाचायला मिळाली.
मस्तच जमली आहे कविता.

अजित वडनेरकर said...

बहुत सुंदर कविता है। आप्टिमिस्टिक भी है और उत्साह बढ़ानेवाली भी। शुक्रिया ....

यशोधरा said...

ChaN lihila aahe Ashatai :)

princess said...

खुप सुरेख लिहिल आहे आशाताई. माझ्या आजुबाजुच्या खुप लोकांना भेट म्हणुन प्रिंट काढुन देईन. कित्ती कित्ती आशावादी लिहिलय तुम्ही !!! सलाम तुम्हाला. म्हातारपण म्हणजे केवळ रिकामपण नव्हे तर ती एक मज्जा म्हणुन जगायचा तुमचा विचार खुप आवडला :)

प्रकाश said...

जरा ’जरा’ हा शब्द घालून कविता बाढवावी.