रोज रोज भेडसावतात मला अज्ञाताच्या सावल्या
ह्रदयाची स्पंदनं वाढू लागतात दुप्पट वेगानं
अन् ते छातीतून बाहेर उडी घ्यायला बघतं
सावल्या आंत आंत आंत शिरतात
अगदी ह्र्दयाच्या गाभा-यात
मोठ्ठया, मोठ्ठया, मोठ्ठया होतात
मी हतबल, भिंतीला टेकून उभी
छप्पर कोसळण्याची वाट बघत.....
एक आवाज येतोय
असं काय करतेस, कशाला एव्हढी घाबरतेस,
ह्या सावल्या तूच तयार केल्यास, तुझ्याच मनाने
अन् तूच त्या घालवू शकशील. तुझ्यातच आहे ती शक्ती
पायातल्या मणा मणाच्या बेडया गळून पडतात
मी खिडकी उघडते
सावल्या लहान, लहान, लहान होत जातात
अगदी एक ठिपका. अन् तोही शेवटी नाहीसा होतो
मी निश्वास सोडते.
कुठे तरी ओठावर एक बारीक स्मित उमटतं.
Wednesday, July 30, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
Very good... keep it up...
"ह्या सावल्या तूच तयार केल्यास, तुझ्याच मनाने
अन् तूच त्या घालवू शकशील."
ही ओळ मस्तच आहे. छान झालीये कविता.
aprateem
Post a Comment