Sunday, March 1, 2009

दिनांत

संध्येच्या छटा
सागर अन् आकाश
झाला सूर्यास्त ।
अंधाराच्या गवती
चांदणीचे फूल
रात्र मलूल ।
हळू हळू येती
अनेक हसरे तारे
मध्यरात्र ।
रात्र गहिरी गहिरी
झोपली ओसरी
दिशा स्तब्ध ।
झाले झुंजुमुजु
गुलाबी केशरी
उष:काल ।

3 comments:

प्रशांत said...

मस्त

शिरीष गानू said...

सुंदर कविता..
माझ्या ब्लोग वर अभिप्राय नोंदवल्या बद्दल धन्यवाद.. पण सर्व श्रेय कुसुमाग्रजांना व गाण्यासाठी, लता मंगेशकर व ह्रुदयनाथ यांना..

चैताली आहेर. said...

sundar rachana.....

ek vegalich anubhuti dete hi kavita....

naavhi kiti sundar...!!