Friday, March 6, 2009
होळी
उधळती रंग अबीर गुलाल
गोकुळ सारे झाले लाल ।
वसंत फुलला वृक्ष वेलीं
देही लाभली नवी नव्हाळी
नैसर्गिक ती चढता लाली
झाले गाल कुणाचे लाल । उधळती...
यमुना तीरी खेळ रंगला
गोपांसव श्रीहरी दंगला
गोपीं संगे नाचे राधा
मुरली वाजवीतो नंदलाल ।उधळती...
तन धुंद अन् मन बेधुंद
लागे सर्वां एकच छंद
श्रीधर माधव गोविंद
रंगवी गोकुळास ब्रिजलाल । उधळती....
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
वाह! काय सुंदर कविता लिहिली आहे हो. खुपच सुंदर..
Post a Comment