Wednesday, May 6, 2009

मत

कुणाला द्यावं मत कुणाला देऊ नये ?
कुणाच्या हाती द्यावी सत्ता, कुणाला देऊ नये ?
पण निरर्थक आहे हा विचार आता
निर्णय घेण्याची वेळ केंव्हांच संपलीय
आता फक्त निकालाची प्रतीक्षा
कोण होणार भारत भाग्य विधाता
ह्या वेळी केलेल्या चुकांची नोंद घ्यायची
रोज त्यांची उजळणी करायची
मग तरी पुढच्या वेळी
बरोबर निर्णय घ्यायला
जमेल आपल्याला
अन् पश्चात्तापाची
वेळ नाही यायची.

1 comment:

Pradeep Vaiddya said...

आपण मराठीतच नाही तर हिंदीतही उत्तम लिहिता ... अनेक शुभेच्छा !