बाई ला अनुभव असतोच
सर्व जाणतं सोडून अजाणत्याला वरण्याचा
तोच कामी येईल बहुतेक आता येतांना तुझ्याकडे
पुरुषाला जातं त्यापेक्षा कदाचित
सोप जाईल हे जग सोडून जाणं
अन् त्या सर्वस्वी अनोख्या जगांत पाय ठेवणं
मी कल्पना करते त्या पेक्षा किती वेगळा
असू शकतोस तू
कि माझ्या कल्पनेतलाच साकार होणारेस ?
मला जाताना, हे बंध तोडतांना
किती कष्ट व्हावेत असं ठरवलं आहेस ?
किती कां असेनात, सहन होऊ दे म्हणजे झालं
आता वेळ जवळ येऊन ठेपलीय
सर्व सोडण्याची.
तेंव्हा शात पणे तुझं नाव घेत घेतच
तुझ्या कडे येणं व्हावं हीच इच्छा.
Wednesday, June 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
आशाताई, जीवनाचं अंतिम सत्य म्हणून...
पण खूप उदास वाटलं.
आशाताई तुम्ही मृत्यू किती त्रास देईल असा विचार करता आहात.
मात्र किशोरकुमारच्या एका गाण्यात:
कधी असहायतेने छळले
कधी लाचारीने छळले
गार्हाणे मृत्यूशी ना
मला जीवनाने छळले
(मूळ हिंदी:
कभी बेबसी ने मारा
कभी बेकसी ने मारा
गिला मौत से नहीं है
मुझे जिंदगी ने मारा)
अशी तक्रार केली आहे.
मृत्यू छळत नाहीच. तो तर मुक्ती देतो.
तेव्हा मृत्यूचा प्रवास हा तर सुखाकडचा प्रवास आहे.
तुमची इच्छा, म्हणूनच नक्की फलद्रुप होणार आहे.
तुम्ही आयुष्यभर जे हिशेब केलेत,
त्या हिशेबात बसणारे हे गणित नाही!
Itakya lavkar kuthe jayachyaa vaartaa karatay?
Ajun khup jagayach ahe chan chan.. khup firaayach..njoy karaayahc..khup lihaayach...
Kavita oktoke ahe...
Asle lihine many..pan asala vichar amaany... [:)]
Kip rocking..........mast bahaardaar kavitahathi lihit rahaa....
kharach jeevanach antim satya hech aahe
Post a Comment