Monday, August 17, 2009

बाळ

बाळ खोड्याळ खोड्याळ
बाळ खट्याळ खट्याळ
बाळ अती खोडया करी
तरी किती लडिवाळ ।

तिचे मोठे मोठे डोळे
भारि लाडिक नि भोळे
उडते भुरु भरु
तिचे रेशमी जावळ ।

रेशमी अंगडे
अन रेशमी सोवळ
हाती पायी अलंकार
अन् गळ्यात पोवळ ।

बाळ खुदुखुदु हासे
चमकती दातुरड्या
कोवळ्या ओठी दिसे
दूध रेषा ती धवल ।

न लागावी ग हिला
बाई कोणाची नजर
तीट लावा झणि गाली
आणि उतरा भाकर ।

3 comments:

प्रशांत said...

बाळाचं स्वागत. आणि तिच्या आई-वडिलांचं आणि आजी-आजोबांचं अभिनंदन.

चैताली आहेर. said...

गोड गोडूली कविता......

मीही सध्या ह्याच कामात आहे....
नव्या बाळाच्या कौतुकात..त्यामुळे कविता वाचायला वेळ मिळत नाही...!!

प्रसाद साळुंखे said...

कित्ती cute आहे कविता :)