Monday, November 2, 2009

एकचि तो भगवान

एक ध्यास, एक ध्यान
एक मन एक प्राण ।
एक ठेव, एक देव
त्याची किती तरी नाव ।
त्याला तुम्ही म्हणा कृष्णा
तोचि तृप्ती, तोचि तृष्णा ।
त्याला म्हणावे का राम
देतो जिवाला आराम ।
त्याला म्हणू या शंकर
तोचि सखा निरंतर
त्याला म्हणावे का हरी
फुंकी प्राणाची बासरी ।
कोणी त्याला म्हणे दत्त
सदा त्याच्या पायी चित्त ।
त्याला विठ्ठल म्हणूया
गुण गाउनी वर्णू या ।
जरी माया असे हवी
तिला मानावे का देवी ।
अंबा तुळजा लक्ष्मी
सदा वसतात मनी ।
मरियम पुत्र येशू म्हणा
बुध्द, महम्मद, माना ।
एक सर्व माझ्या लेखी
भाव असूद्या अनेकी ।
नावें किती विद्यमान
एकचि तो भगवान ।

2 comments:

प्रशांत said...

अष्टाक्षरी छंदामध्ये मस्त जमलीये कविता. देवांची नावंही खूप आकर्षकपणे गुंफली आहेत.

क्रांति said...

kavita avadali.