Monday, November 9, 2009

आशा निराशा

सर्रकन् ढगांनी भराव आभाळ
अन् काळ्या काळ्या अभ्रांनी
सूर्यास झाकून टाकावं
तशीच झाकोळते निराशा मनाला
अन् ग्रासून टाकते सारे प्रसन्न विचार ।

ह्रदय कसं मलूल पडतं
अन् चेहेरा चिंतातुर
कां ? कसं ? कुठे ? केंव्हां ?
प्रश्नांच्या उत्तरांना मन आतुर ।

पण हे सर्व ही सोसायचंय धीरानं
कारण ढगा आडून सूर्य येतोच बाहेर
तसंच निराशेचं हे मळभ होणारच दूर
अन् आशेचा सूर्य देणारच आहेर ।

1 comment:

शिरीष गानू said...

तळपत्या उन्हाळी,
डाम्बराला देखील असते झळाळी,
अंगाची होते लाही..
सुचतच नसते काही..
एकदम कुठूनसा ढग येतो..
वारा देखील थंड वाहतो,
लांबून मातीचा सुगंध येतो,
निराशा झटकून मी पुन्हा त्याच
गिरण कामाला लागतो.. :-(