Tuesday, August 3, 2010

नगण्य



असलो जरी कण धुळिचा
एकदा चमकेन लखकन्
असलो जरि तृण इवले
पाउलां जाईन सुखवुन ।
ह्या अफाट ब्रम्हांडी
नगण्य अस्तित्व जरी
सहवासी होणा-यां
देईन साथ रसरसून ।
जरी जग हे बदलाया
पडतिल बाहू अपुरे
मुंगीच्या एव्हढा
प्रयास नक्की घडविन ।
जरी माझे नाव कुठे
दिसणार नाही कुणा
पण माझा हातभार
गेला असेल स्पर्शुन ।
अन् जग हे सोडतां
अश्रू न ढाळो कुणि ही
पण माझ्या चेहे-या वर
समाधान नक्की पसरिन ।

10 comments:

RADHIKA said...

अरे वाह इतकी छान मराठी कविता वाचून खूब खूब छान वाटल थैंक्स
वीणा साधिका

RADHIKA said...

तुमच्या ब्लॉगला फॉलो कस karu?इथे कोणता ऑप्शन दिसत नाहिए

Coral said...

सुन्दर कविता .... आज प्रथमच तुमच्या या ब्लॉग वर आले .... इतर कविता वाचून पण छान वाटले.

अजुन दादानच्या कविता वाच्ल्या नाहीत ... पण जरुर वाचेल व अभिप्राय देईल.

Aruna Kapoor said...

लहान अस काहिच नाहीं... प्रत्येक पाणी व वस्तुच आपल एक महत्व असतेच!....सुंदर कविता!

....आपली शुभेच्छा मिळाली!... माझ्या साठी ती खूपच महत्वपूर्ण व सुखद आहे!... धन्यवाद!

RADHIKA said...

नमस्कार आशा जी ,धन्यवाद मेरे ब्लॉग पर आने के लिए .आपको धन्यवाद देने हेतु लिखी मेरी यह पोस्ट समय निकल कर अवश्य पढ़े .http://aarohijivantarang.blogspot.com/2010/08/blog-post_11.हटमल

आप कृपया पुन:बताये की आपका ब्लॉग फौलो कैसे करू .आपने जो लिंक दी उससे तो बस ब्लॉग खुल गया ,

RADHIKA said...

.http://aarohijivantarang.blogspot.com/2010/08/blog-post_11.html

प्रशांत said...

masta kavitaa..

yaa kavitechaa flow khuup aavaDala.

Unknown said...

apratim khup surekh aani ashawadi kavita.
http://mehhekk.wordpress.com/

Suman said...

asha tai khupach sunder kavita ahe akherchya chaar linei tar mala khup avadlet.........

shashankk said...

खूप छान कविता - आशयपूर्ण व नेमक्या शब्दात व्यक्त केलेली.
शशांक