Saturday, September 11, 2010

गणपति बाप्पा मोरया



लागला रे होता केंव्हांचाच ध्यास
आज माझी आस पुरविली ।
किती दिवसांनी आला देवा घरी
आनंद संसारी दाटियेला ।
यावे यावे देवा, स्वागत तुमचे
दाराशी तोरण नारळाचे ।
पाया वर घालू दूध आणि पाणी
प्रवासाचा शीण घालवाया ।
आसन देऊन स्थापना करूया
मखर सुंदर सजविले ।
सुगंधी जलाने स्नान करवू या
नवी आभरणें तुज लागी ।
चंदनाची उटी कस्तुरी तिलक
मस्तकी शोभती जवा फुले ।
दुर्वांची जुडी देईल थंडावा
मोदक प्रसादा ठेवियले ।
पूजा, प्रार्थना, धूपाचा सुगंध
आरती ओवाळू पंचदीप ।
गोड हे मानावे, आतिथ्य रे बाप्पा
आता तूज घालू दंडवत ।

6 comments:

प्रशांत said...

आशाताई,
मस्त अभंग आहे. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
गणपतीबाप्पा मोरया!

पूनम श्रीवास्तव said...

aadarniy mam,
ye to samajh me aa raha hai ki bhavan shree ganesh ji ki aarti hai.bahut kuchh arth bhi samajh me aaraha hai par puri tarah nahi.
jay ganpati bappa mourrya.
poonam

Unknown said...

khup surekh aaradhana,ganesh utsavachya khup khup shubhechya.
http://mehhekk.wordpress.com/

चैताली आहेर. said...

खुप छान आहे कविता......
प्रसंगोचित लिहिणे छानच जमते तुम्हाला....
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा....!

Mohan Lele said...

†Ö¿ÖÖŸÖÖ‡,
ÝÖÞÖ¯ÖŸÖà“Öê þÖÖÝÖŸÖ, ŸÖã´Æüß ‹¾Öœêü •ÖÖê¸ü¤üÖ¸ü Ûêú»ÖêŸÖ, ÜÖ¸ü“Ö ÛúÖîŸÖãÛúÖ»ÖÖ ¿Ö²¤ü“Ö ®ÖÖÆüߟօ
¯ÖÏŸµÖêÛú ¿Ö²¤üÖŸÖ ³ÖÖ¾Ö †ÖêŸÖ¯ÖÏÖêŸÖ ³Ö¸ü»ÖêŸÖ!
³ÖÖ¾Ö †Ö×ÞÖ ³Ö׌ŸÖ“Öê ×´Ö»Ö®Ö, ´ÆüÞÖ•Öê“Ö ÃÖÓŸÖ ¯Ö¸Óü¯Ö¸üÖ!
†®ÖêÛú ¿Öã³Öê“”ûÖ!

Asha Joglekar said...

Lele saheb tumachi pratikriya code language madhe aaleey.