Tuesday, June 17, 2014

रात्र आणि दिवस


रात्र सावळी सुंदर
काळाभोर केशभार
नेसे काळी चंद्रकळा
हिरे मोती अलंकार।

कोण तिचा प्रियकर
कोणा साठी हा श्रृंगार
कोणाची पाहते वाट
आहे कोण तो येणार।

रात्र जागविते रात्र
पुन्हा वेळावते मान
आला का घेते चाहूल
दश दिशा झाल्या कान।

वाट पाहून पाहून
निशा राणि पेंगुळली
आणि तिच्या प्रांगणात
उषा सुंदरी पातली।

आत आला रविराज
भेटे प्रिय उषा राणि
दिवसाची सुरवात
होते त्यांच्याच मीलनी।

चालतसे लपंडाव
रात्र दिवसाचा असा
रविराज येता येता
करते प्रयाण निशा।


7 comments:

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

Farach chhan

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

Sundar

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...
This comment has been removed by the author.
आशा जोगळेकर said...

धन्यवाद प्रतिमा ताई।

प्रशांत said...

मस्त! आशाताई, बऱ्याच दिवसांनी ब्लॉगवर आलो आणि मस्त वाटलं कविता वाचून. कशा आहात तुम्ही? सध्या दिल्लीत की साऊथ कॅरोलिनात?

आशा जोगळेकर said...

South Carolina .

रचना दीक्षित said...

आशा जी मराठी समझती तो नहीं हू पर भाव समझती हूँ
वैसे गुजरती भली भांति जानती हूँ
रात्रि का सुनदर चित्रण उषा रानी के साथ सूरज का आना अद्भुत
आभार