
चांदण्याचे पंख लागलेय आज मनाला
उमलले आहेत लाखो लाख गुलाब
श्रावणाच्या धारांत नाहून निघालय बेटं मन
लोळतंय हिरवळीवर खुशाल चाखत कोवळं ऊन
सारे सारे शब्द पडताहेत कानावर अमृत होऊन
सा-यांच्या नजरा करताहेत वर्षाव प्रेमाचा
कशाची ही किमया कशाची ही जादू
कुणाला विचारू कुणाला सांगू
पण गरजच नाहीय त्याची
जाणतेय मीच माझी
आज होणाराय ना आपली भेट
संध्याकाळ पासून रात्री पर्यंत थेट.

3 comments:
सुरेख कविता..
नेहमीपेक्षा एकदम वेगळी आहे.
नमस्कार आशाताई,
कविता खरंच छान आहे..
आवडली!
तात्या.
अवांतर - आपण http://www.misalpav.com/ येथेही यावे आणि लेखन करावे ही विनंती..
तात्या.
khup sundar.... :)
Post a Comment