गणपती वंदन
१
नमस्ते विघ्न विनाशका
गणाधिपा गण नायका
विद्याधरा सुखदायका
मज देई सुबुध्दी विनायका
२
डोळ्यांनी भक्तांस नित्य जपतो
सोंडे हि कुरवाळितो
भक्तांचे अपराघ पोटि धरितो
करुणाच वर्षावितो
शञूचा पाडाव तोचि करितो
भक्तांसि जो रक्षितो
तो माझा गणपती मी नित्य भजतो
आशिर्वचा मागतो
1 comment:
छानच आहेत दोन्ही श्लोक. मुख्य म्हणजे दुसरा श्लोक शार्दूलविक्रीडित या वृत्तात बसवण्याचा प्रयत्न आवडला.
Post a Comment