Monday, October 22, 2007
शब्द
शब्द म्हणजे बाण, एकदा का निसटला कि निसटला
शब्द म्हणजे गोळीच बंदुकीची, अनवधानानी सुटली तरी
घायाळ करतेच कधी कधी जीव सुध्दा घेते
शब्द म्हणजे सुरी काळीज कापत जातात
शब्द म्हणजे निखारे जिवाला चटके देतात
शब्द म्हणजे फुलं मन प्रसन्न करतात
शब्द म्हणजे संजीवनी जीवनदान देतात
शब्द म्हणजे मलम जखमेला गोंजारतात
शब्द म्हणजे फुंकर थंडावा देतात
शब्द म्हणजे तुषार रोमांच उभे करतात
शब्द म्हणजे संगीत मन तृप्त करतात
असे हे शब्द कडू, गोड, तिखट, आंबट
थोडे थोडे खूप जपून वापरायचे असतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
आशाताई,
..खूप छान लिहिता आपण.
..कविता खूपच अप्रतिम आहे.
तुमचा ब्लॊग छान आहे, आवडला. माझ्या 'काशीबाई' या व्यक्तिचित्राला आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल अनेकानेक आभार..
तात्या.
http://www.misalpav.com/
Post a Comment