Friday, November 2, 2007

कोपरा



माझ्या मनातला एक कोपरा
राखून ठेवलाय मी खास माझ्या साठी
त्या कोपय्रात राहाते एक मुलगी
बालिश अल्लड भोळी
तिच्यातलं लहानपण ओसंडून वाहू देते मी
जपून ठेवते तिची नव्हाळी
माझ्या जवळ येत जाणाय्रा वार्धक्याची
तिला लागू देत नाही मी चाहूल
तिचं कैशोर्य़ आणि तारुण्य
तिला उपभोगू देते खुशाल
तिच्या गगनाला गवसणी घालण्याच्या
महत्वाकांक्षांना घालते खत पाणी
अन् तिचा विकास बघून सुखावते मनोमनी
मला असाच ठेवायचाय हा कोपरा
खास माझा फक्त माझ्या साठी.

3 comments:

a Sane man said...

छान. कविता आवडली.

प्रशांत said...

आशाताई,
ही कविता फारच आवडली. आपलं बालपण जपणं किती कठीण असतं नाही? किंवा परिस्थितीमुळे किंवा तिच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोणामुळे आपण ते कठीण करून ठेवतो.
तुमचा ब्लॉग मी अधुन मधुन वाचत असतो. त्यातली चित्रेही छान आहेत. माझ्या आईच्या ब्लॉगवरही आपण प्रतिक्रिया देत असता हे पाहून आनंद झाला. खरंतर तिच्याकडे सध्या प्रकाशित करण्यासारखं बरंच आहे. पण मी सध्या तिच्याजवळ नाही आणि घरच्या इन्टरनेटमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत म्हणून थोडी गती मंदावली आहे. इतकंच.
विचारांची देवाणघेवाण अशीच चालत राहो.
अनेक शुभेच्छा!
प्रशांत

अरविंद said...

आशाताई,
सर्वप्रथम आपण माझ्या "तुजविण’ या कवितेत दुरुस्ती कळवली, खूप मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सुचनेबरहुकूम सुधारणा केली.

आपली कविता खूप आवडली..

...कोपय्रात ...ऐवजी कोप-यात असे लिहू शकता.
..झुळुक.....झुळूक असे हवे माझ्या मते.

...मी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभातील कार्यकारी अभियंता पदावरून नुकताच सेवानिवृत्त झालोय..

....अरविंद