कसा असेल तो प्रवास आजवर कधीच न केलेला
ज्ञाता कडून अज्ञाता कडे गेलेला
कोणचं असेल ते वाहन जे नेईल गंतव्या कडे
तिथे जाणारे रस्ते असतील सरळ की वाकडे
प्रकाश असेल का वाटेत कि असेल फक्त अंधार
शून्यच असेल कि असेल एखादा तरी विचार
भेटतील का तिथे ती सारी जी गेलीत जिवाला चटका लावून
कि होत्याच्या नव्हत्यात जाईन मी ही विरून
अन् तो भेटेल का तिथे मला, तो ज्ञानोबाचा विठ्ठल
तो व्यासांचा कृष्ण तो रखुमा देवीचा वर
ज्यानी सांगितलंय गीतेत कि सारे त्याच्याच कडे येतात
माना वा न माना त्याच्यातच विलय पावतात
Wednesday, November 21, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
प्रवास, मग अगदी आपला नेहमीचा असला, तरी "प्रकाश असेल का वाटेत कि असेल फक्त अंधार" असा प्रश्न पडतोच. जीवनाच्या प्रवासात तर या प्रश्नमुळेच कुतुहल आहे, आणि मरणोत्तर प्रवासात हा प्रश्नच भय/विकल्प निर्माण करतो असं वाटतं.
छानच आहे कविता.
प्रवास छान झाला हं
आशाताई,
आपली कविता एक अजाण,गूढ अशा न अनुभवलेल्या
पायवाटेवर घेउन जाते.
खरचं
असे वाट्ते या पॄथ्वीवर आपण माणसे कसे आलोत? अन शेवटी कूठे जाणार!
आपल्या कवितेचा शोध मात्र येथवर नेउन सोड्तो.
वा!आशाताई , छान !! एक गुढ प्रवासावरची कविता मला आणि प्राजक्ताला खूप आवड्ली .
आपण नेहंमी माझ्या ब्लाँगवर भेट देतात त्या बद्दल
आभारी आहे.
कविमनाची माणसं भेट्ल्यावर खरी मनापासूनची दाद नक्कीच मिळते.हो ना!
प्राजक्ताला प्रवास खूप आवड्ली .ती म्हणते की
मला प्रवास खूप करायला आवडतो.आपण आपल्या प्रवासातले निसर्ग रम्य फ़ोटो व क्लिप्स सहज उपलब्ध करुन दिलेत , ते निसर्ग रम्य फ़ोटो छान आहेत.
कळावे.
प्रा.सचिन पाटील.
कु.प्राजक्ता
आवडला प्रवास, जाणवला, पोचायची नकळत का होईना घाई झाल्यासारखं वाटत मनाला मधेच कधितरी; का ते कळत नाही नुसताच गुंता सुटतही नाही आणि संपतही नाही हल्लीतर शब्दातून मिळणारी उत्तर पण मिळेनाशी झालीयेत फार बोलले बहुतेक.
माझ्या ब्लॉगवरच्या शहाण्या वेडेपणाला दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. :)
नव्या कवितांची वाट पहात्ये.
Post a Comment