सागर अन् आकाश
दोन्हींत जाणवतो तुझाच प्रकाश
त्यांची अथांगता, असीमता त्यांची
दोन्हींत होते तुझीच प्रचीती
एरव्ही आकलन शक्ती बाहेरचा तू
कधी कधी कित्ती जवळचा वाटतोस
एखाद्या मित्रा सारखा, आई सारखा, भावा सारखा
धावून येतोस मदतीला आमच्या
अन् कधी कधी इतका अंत पाहातोस
कि तुझ्या अस्तित्वा विषयीच वाटते शंका
आम्हा सामान्यांची नको रे घेऊस अशी परिक्षा
नको देऊस अशी कठोर शिक्षा
तसाच रहा जसा वाटतोस
जवळचा
Friday, October 31, 2008
Sunday, October 26, 2008
शुभ दीपावली
नक्षत्रांच्या ओळी उतरल्या धरेवरी
आज चांदणेच गडे पडले सोनेरी
अदम्य उत्साह राहिला बघ भरोनी
शिगोशिग मनांमनांत नगरी अन् ग्रामी
ह्या प्रकाश पर्वाचे देणे देऊ या
अंधकार कलहाचा दूरच हटवू या
सारे मिळुनी उजळू नाव भारताचे
ही दीपावली हाच अम्हां संदेश अता देते
आज चांदणेच गडे पडले सोनेरी
अदम्य उत्साह राहिला बघ भरोनी
शिगोशिग मनांमनांत नगरी अन् ग्रामी
ह्या प्रकाश पर्वाचे देणे देऊ या
अंधकार कलहाचा दूरच हटवू या
सारे मिळुनी उजळू नाव भारताचे
ही दीपावली हाच अम्हां संदेश अता देते
Tuesday, October 7, 2008
उजवं डावं
जीवन सुंदर असतं तसंच कुरूप ही असतं
आपल्याला कुठलं हवंय ते जपायचं असतं.
माणूस छान असतं तसं वाईट ही असतं
कारण माणूस शेवटी माणूस असतं

बागेत फुलं असतांत तसे काटे ही असतात
काट्यांना चुकवून, फुलांना हुंगायचं असतं
जीवनांत यश असतं तसंच अपयश ही असतं
यशानं हुरळायचं नसतं, अपयशानं खचायचं नसतं
जगांत मित्र असतांत तसेच शत्रू ही असतात
त्यांतच आपल्याला जगायचं असतं
उजवं असतं तसंच डावं ही असतं
त्यात वावगं असं काहींच नसतं
जग हे असं आहे, अन् असंच असतं
आपल्यालाच मार्ग काढून पुढे जायचं असतं
Subscribe to:
Posts (Atom)