Sunday, October 26, 2008

शुभ दीपावली

नक्षत्रांच्या ओळी उतरल्या धरेवरी
आज चांदणेच गडे पडले सोनेरी
अदम्य उत्साह राहिला बघ भरोनी
शिगोशिग मनांमनांत नगरी अन् ग्रामी

ह्या प्रकाश पर्वाचे देणे देऊ या
अंधकार कलहाचा दूरच हटवू या
सारे मिळुनी उजळू नाव भारताचे
ही दीपावली हाच अम्हां संदेश अता देते

1 comment:

Sonal said...

दिवाळी हे सांगते हे नक्कीच! कडक उन्हातून दाट झाडाखाली बसल्यावर थंड वार्‍याची झुळूक जशी शांतता देऊन जाते ना! तसंच वाटलं तुमच्या कविता वाचताना.