सागर अन् आकाश
दोन्हींत जाणवतो तुझाच प्रकाश
त्यांची अथांगता, असीमता त्यांची
दोन्हींत होते तुझीच प्रचीती
एरव्ही आकलन शक्ती बाहेरचा तू
कधी कधी कित्ती जवळचा वाटतोस
एखाद्या मित्रा सारखा, आई सारखा, भावा सारखा
धावून येतोस मदतीला आमच्या
अन् कधी कधी इतका अंत पाहातोस
कि तुझ्या अस्तित्वा विषयीच वाटते शंका
आम्हा सामान्यांची नको रे घेऊस अशी परिक्षा
नको देऊस अशी कठोर शिक्षा
तसाच रहा जसा वाटतोस
जवळचा
Friday, October 31, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
[:)]
hmm....
आशाताई
भरपूर दिवसांनी ब्लाँगवर आलोय, कविता फारच छान! त्याचे वर्णन करणारे आपण कोण? प्रत्येक कण आणि क्षण त्यानेच व्यापलेला आहे.
समीप, असीम आणि आसमंत सारी त्याचीच रुपे!!
स्व तील श्वास तो आहे, बाकी सर्व मी आहे.
सागर अन् आकाश
दोन्हींत जाणवतो तुझाच प्रकाश
त्यांची अथांगता, असीमता त्यांची
दोन्हींत होते तुझीच प्रचीती
ईश्वराची प्रचीती अगदी आपल्या आस-पास, प्रत्येक क्षणी होत असते।...आशाताई, खूपच छान वाटल।
Post a Comment