Tuesday, October 7, 2008

उजवं डावंजीवन सुंदर असतं तसंच कुरूप ही असतं
आपल्याला कुठलं हवंय ते जपायचं असतं.

माणूस छान असतं तसं वाईट ही असतं
कारण माणूस शेवटी माणूस असतं

बागेत फुलं असतांत तसे काटे ही असतात
काट्यांना चुकवून, फुलांना हुंगायचं असतं

जीवनांत यश असतं तसंच अपयश ही असतं
यशानं हुरळायचं नसतं, अपयशानं खचायचं नसतं

जगांत मित्र असतांत तसेच शत्रू ही असतात
त्यांतच आपल्याला जगायचं असतं

उजवं असतं तसंच डावं ही असतं
त्यात वावगं असं काहींच नसतं

जग हे असं आहे, अन् असंच असतं
आपल्यालाच मार्ग काढून पुढे जायचं असतं

1 comment:

jayaka said...

मराठी भाषेची झुळुक फार बरी वाटली... मन आनंदात रमून गेले।... एक सुंदर रचना अचानकच सामोरी झाली।...धन्यवाद आशाताई।...माझ्या ब्लॉग वर अवश्य यावे।