Thursday, August 6, 2009
लेवून भूषणें ये ना
लेवून भूषणें ये ना
वेढून चांदणे ये ना
त्या तिथे नदी तीरा वर
बघू स्वप्न देखणें, ये ना ।
कधी वसंत, ग्रीष्म कधी
वर्षाऋतु, शरद कधी
प्रीती चे गूज तुझ्या
कानांत सांगणे, ये ना । लेवून....
अवखळ हसु गालांवर
उडता उन्मुक्त पदर
भिरभिरती धुंद नज़र
तोडून बंधने, ये ना । लेवून....
मोकळाच केश पाश
चालू नको सावकाश
वा-याची पाउलांत
बांधून पैंजणें, ये ना । लेवून....
हात तुझा दे हाती
गात्रें कशी थरथरती
हळुवार भावनांनी
अस्फुट बोलणें, ये ना । लेवून....
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
आशाताई, सुंदर कविता आहे. भावली.
asha tai ,khoop chaan poem aahe , mala faar aavedli ..
vijay
pls read my new poem "झील" on my poem blog " http://poemsofvijay.blogspot.com
क्या बात है! मस्त आहे कविता!
"वा-याची पाउलांत बांधून पैंजणे ये ना" ही ओळ खूपच आवडली.
आणि शेवटचं कडवं.
मोकळाच केश पाश
चालू नको सावकाश
वा-याची पाउलांत
बांधून पैंजणें, ये ना । लेवून....
अहाहा...... अगदी नाजुक-साजूक....!!
Post a Comment